दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा यांचा देखील सुषमा अंधारे यांनी कडवट शब्दांत समाचार घेतला आहे. “नवनीत राणा यांच्या बद्दल मला फार काही बोलावसं वाटत नाही. भाजपने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलण्यासाठी काही सब कॉन्ट्रॅक्ट काढले आहेत ते सब कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी आणि मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात स्वतःची वर्णी लागण्यासाठी अनेक आमदार खासदार उतावीळ झालेले आहेत. त्यामुळे ते वाचाळ पद्धतीने वाटेल ते वक्तव्य करत आहेत. म्हणूनच त्यांच्या उथळपणावर आपण काय बोलावं”. असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.
पडळकरांची टीका, ‘निर्मला सितारामन या बिन टाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर,
एक गोष्ट नक्की आहे. नवनीत राणा जेव्हा म्हणतात की, मी अपक्ष म्हणून निवडून आले तेव्हा त्यांना याची जाणीव असली पाहिजे की आपण राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन निवडणुकीला उभे राहिला होता. तुमच्या जात प्रमाणपत्रावर अनेक वेळा प्रश्नचिन्ह लागलेले आहेत. त्यामुळे तुम्ही इतक्या लोकांची फसवणूक करून त्या पदावर बसलेल्या आहात. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी बोलेल तेच खरं. तर तुमच्यासाठी हे आवर्जून सांगितलं पाहिजे. मांजर डोळे मिटून दूध पिते याचा अर्थ जग त्याला बघत नाही, असं अजिबात होत नाही. तुमची सगळी उथळपणाची वक्तव्य तुमचा मतदारसंघ बघत आहे, आणि त्याचे उत्तर अमरावतीकर तुम्हाला खाणकावून देणार आहेत, असा जोरदार टोला सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांना लगावला आहे.
Baramati : पवारांना त्यांच्या ऐकण्यातली नकली शिवसेना पाहिजे, बारामतीत गरजले
Recent Comments