Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हगवणे कुटुंबीयांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने पती, सासू आणि नणंद यांना 1 दिवसाची, तर सासरा आणि दिर यांना पुन्हा 3 दिवसांची म्हणजे 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान कोर्टात युक्तिवाद करताना हगवणे कुटुंबाच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. वैष्णवीची आत्महत्या करण्याची प्रवृत्ती होती असा दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलाने केला आहे. तसंच तिने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं सांगितलं आहे.
सरकारी वकिलाने युक्तिवाद करताना म्हटलं की, “आरोपींचे मोबाईल सापडलेले नाहीत. आरोपींचे मोबाईल तपासायचे आहेत. कदाचित मोबाईलमध्ये आणखी काही व्हिडिओ असण्याची शक्यता आहे. आरोपींनी वैष्णवीला मारहाण केली ती हत्यारे आणि रॉड हस्तगत करायचा आहे. आत्तापर्यंत योग्य दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे”.
त्यानंतर आरोपीच्या वकिलाने युक्तिवाद करायला सुरुवात केली. आता पोलीस कोठडीची गरज नाही असा दावा त्यांनी केला. “सोने कुठल्या बँकेत गहाण ठेवले आहे हे हगवणेंनी आधीच सांगितंल आहे. निलेश चव्हाणला या प्रकरणात आरोपी करणे चुकीचे आहे. निलेश चव्हाणने बाळाला सांभाळलं. पण उलट हेळसांड केली म्हणून निलेश चव्हाणवरच गुन्हा दाखल केला आहे. निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही. तो दोषी असेल तर त्याला फाशी द्या. पण त्याला या प्रकरणात आरोपी करणेच चुकीचे आहे”, असं वकील म्हणाले.
आरोपींच्या वकिलांनी यानंतर वैष्णवीचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. “वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा आहे,” असं ते म्हणाले.
हगवणेंचे वकील – वैश्नवीची टेंडंसी सुसाईड करण्याची होती. तीचे एका व्यक्तीसोबतचे चॅट वाचले गेले होते. त्यातून ती आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा केलाय. एकदा रॅट पॉयझन खाऊन आणि एकदा गाडीतुन उडी मारून.
हगवणेंच्या वकिलाने म्हटलं की, “वैष्णवीची आत्महत्या करण्याची प्रवृत्ती होती. तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट वाचले गेले होते. त्यातून तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. एकदा उंदीर मारण्याचं औषध खाऊन आणि एकदा गाडीतुन उडी मारून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता”.
दरम्यान यावेळी वकिलाने बायकोला कानाखाली मारणं छळ नाही असा अजब युक्तिवाद केला. “एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ ठरत नाही,” असा युक्तिवाद त्याने वैष्णवीच्या अंगावरील व्रणांसदर्भात बोलताना केला.
Recent Comments