शिरूर, पुणे : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथिल श्री महागणपती मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली, अशा आशयाचे बॅनर व्हायरल झाले होते. सर्वत्र बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. आता देवस्थान ट्रस्टने याबाबत आपली भूमिका मांडली आहे.देवस्थानच्या अध्यक्ष स्वाती पाचुंदकर यांच्याशी यांनी याबाबत माहिती दिली आहे. अशा प्रकारचा कोणताही निर्णय देवस्थानने घेतलेला नाही. शिवाय देवस्थानच्या वतीने कुठेही अशा आशयाचे फलक अधिकृतरीत्या लावलेले नाहीत. देवस्थानच्या अधिकृत संकेस्थळावर कुठेही अशा पोस्ट नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

तुळजापूर येथे देखील अशा आशयाचे बॅनर प्रसिद्ध करत तोकडे कपडे घालण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले होते. मात्र समाज माध्यमांवर यावरून टीका झाली. आणि यावर तुळजापूर देवस्थानने असा कुठला निर्णय घेतलाच नसल्याचे समोर आले. असे कुठलेही बॅनर लावण्याचे आदेश मंदिर प्रशासनाने दिलेच नाहीत किंवा तसा ठराव देखील झालेला नाही, असे तुळजाभवानी संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्पष्ट केले. आता रांजणगाव गणपती देवस्थानानेही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

Tulja Bhavani: तुळजाभवानी मंदिरात ड्रेसकोडचा आदेशच नाही, मग ते फलक लावले कोणी?, आता चौकशी होणार
रांजणगाव गणपती हे अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र आहे. श्री महागणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी पूर्वीपासून चालत आलेल्या धार्मिक प्रथा परंपरेचे पालन करून श्री महागणपतीचे दर्शन घ्यावे. मंदिरात प्रवेश करताना भाविकांनी कृपया भारतीय संस्कृतीचे जतन होऊन संस्कृतीचा आदर करावा, असे आवाहनही श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाकडून करण्यात आले आहे.
Tulja Bhavani: तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी नियमावली जारी; ड्रेसकोड लागू
अष्टविनायक पैकी एक असलेले हे एक तीर्थ क्षेत्र आहे. या ठिकाणी राज्यासह देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. रांजणगाव गणपतीचे महागणपती असे नाव आहे. त्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. दर शनिवार, रविवार आणि चतुर्थीच्या दिवशी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. मात्र, काल जो प्रकार झाला, याविषयी देवस्थानने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अद्याप असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे देवस्थानने म्हटले आहे.



Source link