पुणे : पुण्यातल्या औंध परिसरात एका आयटीआय इंजिनीयरने आपल्या मुलासह पत्नीची हत्या करून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पॉलिथिनची पिशवी तोंडाला गुंडाळून मुलगा आणि पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. औंध येथील डीपी रोड परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. प्रियांका गांगुली (वय ४०), मुलगा तनिष्क गांगुली (वय ०८) आणि पती सुदीपतो गांगुली (वय ४४) असं या मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नाव आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचा भाऊ बँगलोरहून पुण्यात आला होता. सुरुवातीला घरातील सर्वजण बेपत्ता असल्याची तक्रार चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता सुदीपतोच्या मोबाईलचे लोकेशन घरातच आढळून आले. त्यानंतर घरी जाऊन तपास केल्यानंतर सगळे व्यक्ती मृत आढळले. घटनास्थळी पोलीस तपास करत असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या धक्कादायक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चतुर्श्रुंगी पोलीस करत आहेत.

H3N2 इन्फ्लुएन्झाने तरुणाचा मृत्यू, नगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली मोठी माहिती



Source link