याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी ही तिची आई आणि मावशीसोबत राहते. उदरनिर्वाहासाठी मुलीची आई आणि मावशी दोघीही कामाला जातात. त्यामुळे मुलगी घरी एकटीच असते. त्या मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेत संबंधित अल्पवयीन त्या मुलीच्या घरात शिरला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्याने १६ मे आणि १८ मे या दोन्ही दिवशी संबंधित तरुणीवर बलात्कार केला.
त्या मुलीची मावशी दुपारच्या वेळी घरी आली असताना तिला मुलगी कावरीबावरी झालेली जाणवली. त्यामुळे तिच्या मावशीने आजूबाजूला याबाबत चौकशी केली. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मुलीवर शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन तरुणाने अत्याचार केल्याचा संशय त्यांना आला.
हेही वाचा –महिलेवर बलात्कार करून हत्या; हैवानाने मृतदेहासोबत केले अमानुष कृत्य
त्यानंतर मुलीच्या आई आणि मावशीने पोलिसात तक्रार दाखल केली. संशयित म्हणून पोलिसांनी त्या शेजारच्या अल्पवयीनला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कारवाईसाठी बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
रोडरोमिओंच्या छेडछाडीत विवाहित तरुणी जखमी, भंगलं पोलीस होण्याचं स्वप्न
Recent Comments