अडचणीचे मुद्दे…
— पिंपरी-चिंचवडमधील यापूर्वीच्या नाट्यगृहांपेक्षा गदिमा नाट्यगृहाची रचना काहीशा वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे.
— नाट्यगृहाचा प्रमुख रंगमंच आणि प्रेक्षागृह हे अर्धवर्तुळाकार स्वरूपात बांधण्यात आले आहे.
— रंगमंचाची लांबी-रुंदी इतर रंगमंचाप्रमाणे असली, तरी त्याचा आकार आयताकृती नसल्याने रंगमंचावर पुरेशी जागा उपलब्ध होणार नाही.
— प्रेक्षागृहाची रचनाही अर्धवर्तुळाकार स्वरूपाची आहे. त्यामुळे शेवटच्या दोन-तीन रांगांमधील प्रेक्षकांना रंगमंचाच्या दोन्ही बाजूंची दृश्यमानता कमी होणार आहे.
‘ग्रीन रूम’ची अडचण
सर्वसाधारणपणे कोणत्याही नाट्यगृहात रंगमंचाच्या मागील बाजूस कलावंतांसाठी ‘ग्रीन रूम’ तयार केलेल्या असतात. काही नाटकांमध्ये वेशभूषा बदलण्यासाठी अत्यंत कमी कालावधी असतो. अशा वेळी रंगमंचाला लागून असलेल्या ग्रीन रूमचा फायदा कलावंतांना होता. गदिमा नाट्यगृहात रंगमंचाच्या एकाच बाजूला वर-खाली अशा स्वरूपात ग्रीन रूम बांधण्यात आल्या आहेत. यामुळे कलावंतांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
६७ कोटी रुपये
गदिमा नाट्यगृहासाठी झालेला खर्च
८८८
गदिमा नाट्यगृहाची आसनक्षमता
Recent Comments