पुणेः आंबिल ओढ्यालगत असलेलं अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या महापालिका कर्मचारी व पोलिसांविरोधात स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिस यांच्यात वाद झाल्यानं या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांना बिल्डरनं नोटिस काढल्यानंतर महापालिकेनं कारवाई केली असल्याचा आरोपही स्थानिक करत आहेत. स्थानिकांच्या विरोधानंतरही पालिकेची कारवाई अजूनही सुरुच आहे. त्यामुळं पोलिस व स्थानिकांमध्ये झटापट झाल्याचीही माहिती समोर येत आहे.
Recent Comments